। खोपोली । वार्ताहर ।
खोपोली नगरपालिकेच्यावतीने बसविण्यात आलेल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंचधातुच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सोमवारी करण्यात आले आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,आ.महेंद्र थोरवे,माजी आम. सुरेश लाड,पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड,खोपोली नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्षा विनिती कांबळे,तहसिलदार आयुब तांबोली, मुख्याधिकारी अनुप दुरे, नरेंद्र गायकवाड यांच्यासह पालिकेचे सर्व सभापती,नगरसेवकांसह खोपोलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास आठवले यांनी खोपोली शहरावर विशेष प्रेम असून पंचधातुचा पुतळा उभारण्यासाठी नगराध्यक्षा सुमन औसरमल आणि नगरसेवक मोहन औसरमल यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद असल्याची स्तुती केली. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, मा.आमदार सुरेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपनगराध्यक्षा विनिता कांबळे तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्षा सुमन औसरमल,नगरसेवक समीर मसुरकर, नगरसेविका केविना गायकवाड यांनी केले. सुत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.