महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

आंबिवली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिवस्मारक’ होते. मात्र, या ठिकाणी सिंहासनावर विराजमान असलेल्या स्मारक असावे, अशी स्थानिकांची इच्छा होती. यासाठी शिव प्रेमींनी मा.आ. मनोहर भोईर यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत दसर्‍याच्या मुहुर्तावर या परिसरातील शिव भक्तांच्या उपस्थित लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा.आ. मनोहर भोईर यांच्या समवेत सरपंच दिपाली पाटील, उपसरपंच प्रांजळ जाधव, राजेश पाटील, संतोष खांडेकर, गोरख रसाळ, नरेश पाटील व सर्व शिवप्रेमी उपस्थित होते.

Exit mobile version