। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या नेरळ स्थानकातील जय मल्हार रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत काढण्यात आलेल्या रॅली नंतर जय मल्हार रिक्षा संघटनेच्या नाम फलकाचे जय मल्हार रिक्षा चालक मालक सामाजिक संस्था मंडळ यांच्या अधिकृत रिक्षा स्टँडचे उद्घाटन सरपंच उषा पारधी आणि पोलीस उप निरीक्षक दहातोंडे व मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रावण जाधव, दिनेश कालेकर, संतोष सारंग, भगवान जमघरे, हरेश्वर विरले, रिक्षा स्टँडचे सर्व रिक्षा चालक-मालक, नेरळ पोलीस ठाणे, विभागीय परिवहन विभाग, शालेय विद्यार्थी, रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना व विद्यार्थी उपस्थित होते.
रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण
