पीडीपीएल क्रिकेट चषकाचे अनावरण

| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने दि. 14 आणि 15 जानेवारी असे दोन दिवस पनवेलमधील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये डॉक्टरांचे क्रिकेट स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्या स्पर्धेचा चषक अनावरण सोहळा सोमवार, दि. 9 जानेवारी रोजी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे पार पडला.

याप्रसंगी डॉ. गिरीष गुणे, डॉ विकास डोळे आणि डॉ राजेश कापसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, सेक्रेटरी डॉ. रवींद्र राऊत, सहसेक्रेटरी डॉ. सागर ठाकूर, खजिनदार डॉ. संदेश बहाडकर, बोर्ड मेंबर्स डॉ. गजेंद्र सिलीमकर, डॉ. सचिन पाटील, डॉ. सुदर्शन मेटकर, डॉ. सोनल शेठ, डॉ. अनघा चव्हाण आणि असोसिएशनचे क्रीडा प्रमुख डॉ. सचिन मोकल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी असोसिएशनच्या कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. आणि पनवेल परिसरातील क्रीडाप्रेमी डॉक्टरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

या क्रिकेट सामान्यात पुरुष संघात पनवेल प्राईड, पनवेल वॉरियर्स, करंजाडे वॉरियर्स, कर्नाळा वॉरियर्स, कामोठे दबंग, उलवे युनायटेड तळोजा टायगर्स, खारघर फोनिक्स, सिद्धी खारघर, खारघर वॉरियर्स, आणि महिला संघात एचएचएफ नवी मुंबई, पनवेल रेंन्जर्स, पनवेल स्ट्रायकर्स, स्मायलिंग स्टार्स, कर्जत अथेना वॉरियर्स, असे भाग घेणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी दिली.

Exit mobile version