। श्रीवर्धन । वार्ताहर ।
रो-रो बोटीची सेवा सुरू करणे म्हणजे कोकणच्या दृष्टीने महत्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. खा. सुनील तटकरे, पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते रो-रो बोटीच्या संकल्प प्रतिमेचे अनावरण पुनीर गौरव येथे संपन्न झाले. यावेळी मा.हर्डीकर, गौतम प्रधान, शशि महाडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, आदी मान्यवर उपस्थित होते. हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र, श्रीमंत पेशवे यांचे जन्मस्थान श्रीवर्धन व सुवर्ण गणेश मंदिर दिवेआगर याठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. लवकरात लवकर रो-रो बोट सेवा सुरू झाली पाहिजे त्यासाठी केंद्रातून लागणार्या परवानगीसाठी अडचण आल्यास मला सांगा. राज्यात काही मदत हवी असल्यास पालकमंत्री यांना सांगा आम्ही सहकार्य करू असे आश्वासन यावेळी खा. सुनील तटकरे यांनी दिली. रोरो सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतील पर्यटकांना श्रीवर्धनकडे येण्याचे देखील आकर्षक वाढेल. असे मत पालकमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केले