राजमाता जिजाऊ तलावातील शिल्पाचे अनावरण

| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील राजमाता जिजामाता तलावाच्या प्रवेशद्वारावर जिजाऊचे शिल्प उभारण्यात आले आहे.त्या शिल्पाचे अनावरण आणि लोकार्पण राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले.तर नेरळ ग्रामपंचायतने कचरा उचलण्यासाठी दोन ट्रॅक्टर खरेदी केल्या आहेत.जिल्हा ग्रामनिधी मधून 15 लाखांचे कर्ज घेऊन या घंटागाड्या खरेदी केल्या असून त्यांचे देखील लोकार्पण करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त आज 12 जानेवारी रोजी असल्याने नेरळ ग्रामपंचायत मधील राजमाता जिजामाता तलावाचे सुशोभीकरण केले जात होते. तसेच नेरळ ग्रामपंचायतमधील वाढते नागरीकरण यामुळे दररोज निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर आणि घंटागाड्या यांची कमतरता जाणवत होती.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतने जिल्हा ग्रामनिधी मधून कर्ज काढून कचरा उचलण्यासाठी दोन ट्रॅक्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी नेरळ ग्रामपंचायतचे उषा पारधी,उपसरपंच मंगेश म्हसकर,माजी सरपंच सावळाराम जाधव,जान्हवी साळुंखे,माजी सभापती सुजाता मनवे, यांच्यासह सदस्य श्रद्धा कराळे धर्मानंद गायकवाड,शंकर घोडविंदे, जयश्री मानकामे, रेणुका चंचे, राजन लोभी, संतोष शिंगाडे, गीतांजली देशमुख, शिवाली पोतदार, उमा खडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version