| पनवेल | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि पनवेलचे माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी (दि.7) कामोठे येथील डीएसपी इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांच्या स्मारक पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरात, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक प्रकाश म्हात्रे, नगरसेवक व गटनेते केतन भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, एम. ए. डीपी. शिक्षण संस्थेचे सीईओ रा.गो. पाटील, माजी नगरसेवक शंकर शेठ मात्रे, प्रमोद भगत व शाळेचे शिक्षक गण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय दत्तूशेठ पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
