| उरण | वार्ताहर |
आज काल शहरीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली गावं उध्वस्त केली जात आहेत. हे सर्व पाहता ‘माझा गाव माझा अभिमान’ ही संकल्पना उराशी बाळगत केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून उरण येथील डोंगरी गावात ‘आम्ही डोंगरीकर’ या नावाचे विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक देण्यात आले. नामफलकाच्या अनावरण सोहळ्या प्रसंगी राजू मुंबईकर, रोहन पाटील, प्रदीप पाटील, संकेत घरत, स्नेहल पालकर, अनिल घरत, कॉन संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील, कॉन संस्थेचे सुरेंद्र पाटील, नवनीत पाटील, संपेश पाटील, क्रांती म्हात्रे, राजेश पाटील, रचित म्हात्रे, मोहित पाटील आणि डोंगरी गावांतील ग्रामस्थ मंडळी सोबतच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत नामफलकांचे अनावरण करण्यात आले.