। पनवेल । वार्ताहर ।
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही क्रिकेट प्रेमी रोटरी सदस्यांसाठी पनवेल परिसरात आयोजित करण्यात येणारी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा 10 ते 12 व 17 ते 19 जानेवारी या कालावधीत खेळवली जाणार आहे. रायगड रोटरी वॉरियर्स हे या स्पर्धेचे आयोजक असून या स्पर्धेत रोटरी 3131 प्रांतातील 40 वर्ष्यांवरील 78 रोटरी सदस्य खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांची 6 विविध संघात प्रत्येकी 13 खेळाडूंचा लिलाव (पैश्यांचा ऐवजी पॉईंट्स) पद्धतीने निवडले जातात.
या वर्षी या स्पर्धेचा लिलाव जय मल्हार हॉटेलच्या किनारा लॉनवर माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे, अध्यक्ष शैलेश पोटे, मा.नगरसेवक गणेश कडू, मिडटाउनचे माजी अध्यक्ष विजय निगडे, पनवेल सिटीचे अध्यक्ष डॉ. रोहित जाधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग ही रोटरी प्रांत 3131 च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
हा दिमाखदार सोहळा यशस्वी करण्यासाठी रोटरी रायगड वारियर्स संघांचे अध्यक्ष गणेश कडू, डॉ. संतोष जाधव, अतिश थोरात, सतिश देवकर, पंकज पाटील, देवेंद्र चौधरी, प्रीतम कैय्या, सुदीप गायकवाड, ऋषी बुवा, अमित पुजारी, डॉ. आमोद दिवेकर, विकेश कांडपिळे, संतोष घोडिंदे, विनोद भोईर, आनंद माळी, पुष्कराज जोशी आदी सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली.