अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न पुरस्कार जाहीर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
छत्रपती संभाजी महाराज उस्तव सोहळा समिती किल्ले पुरंदर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट प्रशासकीय सेवारत्न’ हा पुरस्कार पुरंदर चे सुपुत्र तथा रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साहेब यांना जाहीर झाला असून, दि.१४ मे २०२२ रोजी खासदार छत्रपती संभाजी महाराज, युवराज शहाजीराजे छत्रपती, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोरोना काळात सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल तसेच पंढरपूरची आषाढी वारी व नाशिकचा कुंभमेळा या ठिकाणी बजावलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल एकंदरीत आत्तापर्यंत बजावलेल्या कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला असून, त्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अतुल उत्तमराव झेंडे यांचे प्राथमिक शिक्षण मु.पो. दिवे ता. पुरंदर जि पुणे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक गावातीलच शाळेत, तर राहुरी येथून एग्रीकल्चर चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक तर दुसऱ्या प्रयत्नात २०११ साली पोलीस उपअधीक्षकपदी निवड प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षणार्थी म्हणून बुलढाणा येथे त्यानंतर माणगाव (जि. रायगड) व नाशिक येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवा बजावली. याकाळात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वचक ठेवण्यात यश मिळाले. त्यानंतर पदोन्नतीने मुंबई व नंतर सोलापूर ग्रामीणला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रूजू. याकाळात वारीचे उत्कृष्ट नियोजन, कोरोना काळात पोलिसांच्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेत नागरिकांच्या आरोग्याच्या खबरदारीसाठी कोरोना काळात काळजी घेत कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी ऐन लॉकडाऊन च्या काळात दररोज विविध पोलीस स्टेशनला भेट देत. पोलीस कर्मचार्‍यांचे मानसिक पाठबळ दिले. तसेच ‘कोव्हिड योध्दा’ हि संकल्पना राबविली युवकांना समावेश करून, त्यांच्या मदतीने कोरोना काळात अनेक उपक्रम राबविले.

सर्वात मोठे म्हणजे कोरोना काळातील वारकरी व प्रशासनातील दुवा म्हणून उत्तम प्रशासकीय सेवा त्यांनी बजावली. यापूर्वी त्यांनी नाशिक येथील कुंभमेळ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबर नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्याचा अनुभव पाठीशी असल्याने, पंढरपूरची वारी देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळली. त्याचबरोबर कोरोनाशी झुंज देणाऱ्या कर्मचार्‍यांशी स्वतःहून संपर्क साधत, वेळप्रसंगी आर्थिक मदत करत आर्थिक त्याचबरोबर मानसिक पाठबळ दिले. त्यामुळे अनेकजण मृत्यूच्या दाढेतुन परतले. कोरोना काळातील त्यांच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान खाकी वर्दीचा या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Exit mobile version