उरण बायपास की मृत्यूचा सापळा?

| उरण | प्रतिनिधी |

उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी उभारण्यात आलेला बायपास रस्ता आता नागरिकांच्या जिवावर उठणार आहे की काय, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तयार केलेल्या या रस्त्यावरच अपघातांचा धोका वाढत असेल, तर हा विकास नेमका कोणाच्या सोयीसाठी? रस्त्याचे उद्घाटन आणि श्रेय लाटण्याची घाई करताना नागरिकांच्या जीवितसुरक्षेचा बळी दिला जात आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

बायपास म्हणजे वाहतुकीचा अडथळा दूर करून प्रवास सुरक्षित आणि सुखकर करणारा मार्ग! मात्र, उरणच्या बायपासची रचना पाहता सुरक्षिततेच्या निकषांना हरताळ फासला गेला आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे. धोकादायक वळणे, वळणांवर उभारलेले गतिरोधक आणि रस्त्याची संशयास्पद रचना पाहता वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करायचा की जीव मुठीत धरून मार्ग काढायचा, असा प्रश्न पडत आहे.घाईघाईत उद्घाटन उरकण्यासाठी हा बायपास थेट उरणच्या स्मशानभूमीजवळच आणून सोडण्यात आला आहे का? नागरिकांना सुरक्षित प्रवास देण्याऐवजी त्यांना स्मशानभूमीचा रस्ता दाखवायचा आहे काय, असा बोचरा सवालही आता उपस्थित होत आहे.

Exit mobile version