नवोपक्रम स्पर्धेत उरणचा बोलबाला

| उरण । वार्ताहर ।

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा एससीआरटी पुणे यांच्यामार्फत दरवर्षी घेतली जाते. यामध्ये जिल्ह्यातील सर्व तालुके आपापल्या शाळेमध्ये राबवलेले वैविध्यपूर्ण नवोपक्रम सादर करत असतात. यावर्षी देखील ही स्पर्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल (डायट) याठिकाणी प्राचार्य डॉ. सुभाष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. प्राथमिक गट व माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये पहिली फेरी संपन्न झाली. त्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये एकूण प्राथमिक गटातून आठ स्पर्धकांची निवड करण्यात आली व माध्यमिक गटातून दोन स्पर्धकांची निवड करण्यात आली. या सादरीकरणात उरण तालुक्यातील तीन शिक्षकांची दुसर्‍या फेरीसाठी निवड झाली होती. सादरीकरणानंतर या तिन्ही शिक्षकांची पहिल्या पाचमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. यावेळी सुभाष महाजन, संतोष दौंड, श्रीमती राठोड, रामदास टोणे, संजय गवारी व सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version