उरण, पनवेलमधील ‘त्या’ 32 गावांना नैना नाहीच!

| जेएनपीटी | वार्ताहर |
उरणमधील लोकप्रतिनिधी, शेतकरी व पत्रकार व ‘नैना’चे अधिकारी यांची बैठक नवी मुंबई येथील नैनाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी उरणमधील 32 विभागात गेले काही दिवस घोंगावत असलेले ‘नैना’ नावाचे चे वादळ हे गैरसमजुतीने उडालेला धुरळा असल्याचे सिद्ध झाले आहे. ही 32 गावं खोपटा नवे शहरमध्ये मोडत आहेत, असे स्पष्टीकरण रवींद्र मानकर, वरिष्ठ नियोजनकार नैना आणि खोपटा टाऊन यांनी केले आहे. याबाबत प्रत्येक ग्रामपंचायतींना खुलासा पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई व नैना यांच्या मधोमध वसणार्‍या खोपटा नवे नगर या शहरात पनवेल तालुक्यातील सात आणि उरण तालुक्यातील 25 अशी एकूण 32 गावे मोडत आहेत. यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकारण म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने नेमणूक केली आहे. यावेळी चिरनेर, खोपटे, कोप्रोली, पिरकोन, सारडे, वशेणी, गोवठणे आदी गावांमधून हजारो वैयक्तिक हरकती घेऊन संबंधित ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच, नैना व खोपटा नवे नगरचे मुख्य नियोजनकार रवींद्रकुमार मानकर व वरिष्ठ नियोजनकार प्रांजली केणी, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, उरण पंचायत उपसभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाजिराव परदेशी, शेकाप चिटणीस सुरेश पाटील आदींसह विविध गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.


विकास आराखड्याची पाहणी
याअगोदर सिडकोने 4 एप्रिल 2013 साली पनवेल तालुक्यातील दिघाटी, साई, कासरभट, डोलघर, कर्नाळा, बारापाडा या सहा गावांचा खोपटा नवे नगर या शहरासाठी 3 एप्रिल 2008 साली विकास आराखडा तयार केला आहे. आता 2 जून 2021 रोजी उर्वरित 26 गावांचा विकास आराखडा तयार करण्याच्या व अगोदरच्या सहा गावांच्या विकास आराखड्याची पाहणी करून बदल करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने सिडकोला दिल्या आहेत.

Exit mobile version