तिंरगा रॅलीला उरणकरांचा प्रतिसाद

। उरण । वार्ताहर ।

उरण नगरपरिषदतर्फे तिरंगा अभियान अंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक रवी भोईर, कौशिक शाह, राजेश ठाकूर, मुख्याधिकारी संतोष माळी यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. ही रॅली पेन्शनर पार्क येथून सुरु झाली. पुढे गांधी चौक, राजपाल नाका, पालवी हॉस्पिटल, कामठा, विमला तलावमार्गे नगरपरिषद येथे सांगता समारोप झाला.

Exit mobile version