। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यात महावितरणचे 26 हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक आहेत. ग्राहक संख्या जास्त असल्याने वीज समस्या तेवढ्याच जास्त आहेत. या वीज समस्या तातडीने सोडवता याव्यात. यासाठी मुरूड महावितरणकडून अर्जंट कॉल सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
एखादी समस्या रजिस्टरमध्ये नोंदवली तरी ती समस्या सोडवण्यास वेळ जात होता. शिवाय वीज ग्राहकास खूप दूरवरून महावितरण कार्यालय गाठणे हे सुधा खर्चिक बाब होत होती. याचा अभ्यास केल्यानंतर आता मुरूड महावितरणने वीज ग्राहकांसाठी अर्जंट कॉल सुविधा प्रणाली आणली आहे. त्यामुळे मरूड तालुक्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे. याबाबत मुरूड महावितरणमार्फत लोकांना निवेदन करण्यात आले आहे की, मुरूड उपविभागातील ग्राहकांनी आपल्या ग्राहक तक्रारीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9029165991 असा देण्यात आला आहे. ग्राहकांनी सदर नंबरवरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. मरूड महावितरणचे उपमुख्यकार्यकारी अभियंता कृष्णात सुर्यवंशी यांनी सांगितले की, ग्राहकाची समस्या तातडीने सोडवण्यासाठी आम्ही हा नंबर दिला आहे. सदरच्या नंबरवर कॉल करताच समस्या ऐकल्यावर तातडीने ती समस्या सोडवण्यात येणार आहे. आमचा ग्राहकाला सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.