। किरण बाथम । पनवेल ।
पनवेल महानगरातील हजरत पीर जमाल शाह दर्गा ट्रस्टच्या वतीने ईद मिलाद्दून नबी उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहात भाविकांचा जुलूस काढण्यात आला. पनवेल तक्का विभागातील दर्गा परिसरातून दर्गा प्रमुख शेख जावेद बाबा, सिझान शेख सय्यद अकबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नारे तकबीर अल्लाह हू अकबर आदी नबींच्या आदरांसह हिंदुस्तान जिंदाबाद, भारत माता की जयच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.आजचा दिवस हजरत मोहम्मद सल्ललाऊ अलेही वसल्लम यांचा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने आज सर्वत्र प्रार्थना, जुलूस आदीद्वारे आपली श्रद्धा व्यक्त केली जाते.