| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आता 2024 साली होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे दोन यजमानपद भूषविणार आहेत. त्यामुळे या दोन्ही संघांना या विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी देण्यात येणार आहे.
सध्याच्या विश्वचषकात सर्वोत्तम आठ संघांची या विश्वचषकासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स आणि श्रीलंका यांचा समावेश करण्यात आला आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे यमजमान असल्यामुळे ते या विश्वचषकात खेळतील. त्याबरोबर आयसीसीच्या क्रमवारीतील बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनाही या विश्वचषकात संधी मिळणार आहे.
हा विश्वचषक नेमका कोणत्या महिन्यात खेळण्यात येणार आहे, याचे वेळापत्रक अजून जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे विश्वचषक 2024 साली होणार असला तरी नेमका कोणत्या महिन्यात खेळवण्यात येणार आहे, हे अजून समजू शकलेले नाही. पण पुढच्या विश्वचषकात कोणते संघ असतील, हे मात्र आता नक्की झाले आहे. मात्र, अमेरिका आणि वेस्ट इंडिज यजमान असल्यामुळे विश्वचषकात खेळता येणार आहे.