मासळी विकताना मास्कचा वापर करा

उपनगराध्यक्ष यांचा मच्छी विक्रेत्यांचा सल्ला
। अलिबाग । वार्ताहर ।
आपली मासळी ग्राहकांना विकताना कायम मास्कचा वापर करावा तसेच ग्राहकाकडून पैसे घेतल्यावर आपले हातही स्वच्छ ठेवा. बाजारात पर्यटक मोठ्या संख्येने येतात म्हणून आपली व कुटूंबाची काळजी घ्या असा सल्ला उपनगराध्यक्ष अ‍ॅड.मानसी म्हात्रे यांनी कोळीबांधवांना दिला. कोळी बांधवांना कोव्हिड सुरक्षेची माहितीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी पी.एन.पी.मार्केटच्या अध्यक्ष गीतांजली पेरेकर यांनी उपनगराध्यक्ष अ‍ॅड.मानसी म्हात्रे, जयपाल पाटील, सावतामाळी पत संस्थेचे अध्यक्ष रमेश नाईक, माजी नगरसेवक आर.के.घरत, पत्रकार सचिन पावसे, आपत्ती व सुरक्षा मित्र पूजा पेडणेकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जयपाल पाटील यांनी गॅसची सुरक्षा, विजेची सुरक्षा, मुलांची सुरक्षा तसेच अपघात व बाळंतपणासाठी 108 रुग्ण वाहिकेचा वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशव्वी करण्यास संध्या पेरेकर, नयना तांडेल, पूनम तबिब, नयना कोरलेकर, भारती रामनाथकर, गीता मुकादम, दत्ता तांडेल, रंजिता पाटील, आपत्ती व सुरक्षा मित्र विकास रणपिसे, सोगावकर, मंगेश राऊत, सुरेश खडपे, प्रसाद ठाकूर, पत्रकार सचिन पावसे, पूजा पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version