| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत मांदाटणेला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भेट देऊन ग्रामपंचायतीने राबविलेल्या योजनाची पहाणी केली. ग्रामपंचायतीने लोकसहभागातून राबविलेल्या योजनाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यानी जलसंधारणअंतर्गत योजनाचे मार्गदर्शन करुन त्यांनी या योजनाचे वापर करण्यास त्यांनी सांगितले. याप्रसंगी गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे, जि. प. चे माजी कृषी सभापती बबन मनवे, तालुका आरोग्य डॉ. गायकवाड, कृषी सहाय्यक देवरे, चंदू पवार, राजाराम धुमाळ, शंकर गोरीवले, श्रीपत मनवे, अनंत पवार, प्रदिप पवार, शशिकांत धोकटे, किसन शिंदे, राजाराम दिवेकर, प्रकाश लाड, धनश्री मुंडे, नीता पवार, शेफाली लाड, शुभांगी शिगवण, मीनाक्षी मनवे, ग्रामसेवक पी. बी. ठाकरे, योगेश पाटिल आदि मान्यवर उपस्थित होते. विनयकुमार सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.






