पेण पालिकेच्या दुर्लक्षाने उत्कर्षनगर जलमय

पेण | प्रतिनिधी |
पेण पालिका हद्दीतील उत्कर्षनगरला यावेळीही पावसाच्या पाण्याचा तडाखा बसला.नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात हा परिसर पूर्णपणे जलमय होऊन गेला होता.या प्रकाराला सर्वस्वी पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांचाच गलथानपणा कारणीभूत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. 1989 च्या पुराच्या दरम्यान कोंबडपाडा, पिंपळडोह आजचा उत्कर्षनगर या परिसरात पाणी शिरले होते. त्या नंतर 2005 ला या परिसरात पाणी शिरले. मात्र मागील 8 वर्षापासून उत्कर्ष नगरच्या घरांमध्ये दरवर्षीच पाणी शिरतेे. याचे महत्वाचे कारण पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक मार्गच बिर्ल्डर मंडळींने बंद करून ठेवले आहेत.

दरवर्षीपेक्षा यंदा घरात शिरणार्‍या पाण्याचे प्रमाण जास्त होते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कलावती मंदिर, केळकरवाडा या बाजूला सुरू असणारे नविन बांधकाम. हे बांधकाम करणार्‍या बिर्ल्डरने पाणी निचरा होणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे डोंगर काठावरून येणारा पाणी सर्व उत्कर्ष नगर, कोंबडपाडा या परिसरात घुसते.

या परिसराची प्रस्तुत प्रतिनिधीने माजी नगराध्यक्ष प्रकाश शिंगृत व नगरसेवक शोमेर पेणकर यांच्या सोबत उत्कर्ष नगरची पाहणी केली असता सर्व विदारक सत्य समोर आले, ते म्हणजे नगरपालिकेची नियोजन शुन्यता. कलावती मंदिरापासून शिंगृतांच्या मागच्या बाजूला जाणारा गटार सत्ताधारी नगरसेवकांच्या सांगण्यावरून फोडल्याने पाण्याचा मार्ग बदलून शिंगृतांसह आरटीओ समोरील सर्व घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कित्येकांच्या जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. तीच बाब ग्रीनसिटी मागील उत्कर्षनगर मधील घरांची झाली. त्याला कारण म्हणजे केळकर वाडयासमोरील नव्याने सुरू असलेले बिर्ल्डरचे काम. तसेच चिंतामणी बिल्डींगसमोरील पाण्याची निचरा होणारी मोरी ही एका बाजूने साफ केलेली आहे तर दुसर्‍या बाजुला पूर्णतः गाळाने भरली आहे. जर पावसाळया अगोदर मोर्‍या, नाले साफ होत असतील तर मग उत्कर्ष नगर मधिल मोरी का साफ झाली नाही? हा ही विचार करायला लावणारा प्रश्‍न आहे. महत्वाची बाब म्हणजे नगरपालिका प्रशासन हे कामचुकारपणा करून ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत. म्हणूनच मोर्‍या, नाले व्यवस्थित साफ होत नाहीत. जर नगरपालिकेच्या अधिकारी वर्गांनी प्रामाणिक काम केल असत तर उत्कर्ष नगरच्या रहिवाशीयांवर दोन दिवस पाण्यात राहण्याची वेळ आली नसती. ही वेळ फक्त आणि फक्त नगरपालिकेच्या नाकर्तेेपणामुळे आलेली आहे.

नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका उत्कर्ष नगरच्या रहिवास्यांना बसला असून सत्ताधारी व अधिकारी बिल्डरांच्या नजरेतून सर्व बाबी बघत असतात. म्हणूनच ही अवस्था पेणच्या नागरिकांवर आली आहे.
शोमेर पेणकर, नगरसेवक

लोकप्रतिनिधी, अधिकारी व बिर्ल्डर यांच्या साटेलोट्यामुळे पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाले आहेत आणि त्याचाच परिणाम उत्कर्ष नगर मधिल आम्हा नागरिकांना पाण्यात राहून भोगावा लागत आहे.
प्रकाश शिंगृत, माजी नगराध्यक्ष

Exit mobile version