घर तिथे लसीकरण

खालापूरात तहसीलची मोहीम सुरू
। खोपोली । प्रतिनिधी ।
राज्य शासन शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी दुर्गम भागातील नागरिक किंवा वृद्ध, दिव्यांग तसेच दुर्धर आजारामुळे लसीकरण केंद्रावर जाऊ शकत नाहीत यांच्यासाठी घर तिथे लसीकरण मोहिम खालापूर तहसिलदार आयुब तांबोली यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली असून तहसिल कार्यालयात उपविभागीय प्रांताधिकारी अजित नैराळे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आले.
मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद रोकडे, नायब तहसिलदार महसुल, राजश्री जोगी, खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, व्हँक्सीन ऑन व्हील संस्थेचे सिनीअर सेल्स मॅनेजर अनुप नागरे, सिप्ला फाऊंडेशन उल्का धुरी, एचआर हेड सिप्ला लि. विनायक काळे, मॅनेजर सिप्ला फाऊंडेशन सुनिल मकरे उपस्थित होते. सदरची मोहीम राबविण्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी रुग्णवाहीका व्हॅक्सिन ऑन व्हील या संस्थेद्वारे पुरविण्यात आलेली असुन सदर रुग्णवाहिकेसोबत या मोहीमेचे समन्वयक अमित पवार सोबत 1 डॉक्टर, 2 आरोग्य सहाय्यक 1 आशा सेविका असे एकुण 5 सदस्यांचे पथक कार्यरत असणार आहे. जिल्हा परिषद रायगड व व्हॅक्सिन ऑन व्हील संस्था यांनी सामंजस्य करार केलेला आहे. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधुन त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे.

Exit mobile version