| माथेरान । वार्ताहर ।
माथेरान गिरीस्थान नगरपालिकेकडून बुधवार पासून गोवर रुबेला लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. माथेरान आसपासच्या परिसरातील आदिवासी भागातील बालकांनी देखील लसीकरण करून घ्यावे यासाठी पालिकेने आवाहन केले आहे.
या लसीकरणची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर आणि दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. यामध्ये 9 ते 12 महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा पहिली मात्रा आणि 16 ते 24 महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा दुसरी मात्रा घेण्याचे आवाहन पालिकेने मार्फत करण्यात आले आहे. तसेच ज्या बालकांचा गोवर रुबेलाचा चुकलेला लसीची मात्रा पण या विशेष लसीकरण मोहिमेत घेण्याचे आवाहन माथेरान नगरपालिकेने मार्फत करण्यात आले आहे.आणि माथेरानच्या आसपासच्या आदिवासी वाड्या मधील मुलांचे लसीकरण देखील यावेळी करण्याचे येथे सांगण्यात आले आहे.