चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबागमध्ये बालरोग तज्ज्ञ डॉ. सागर खेदू यांच्या मोरया हॉस्पिटलमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने (सशुल्क) कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या उपस्थितीत शेकाप महिला आघाडीप्रमुख, नगसेविका चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विनायक पाटील, डॉ. गवळी, डॉ. रुपाली खेदू, डॉ. राहुल म्हात्रे, चेंढरे उपसरपंच यतीन घरत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.