18 किमी चालून केले लसीकरण


। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील वेयान हॅमलेट हे गाव देशातलं पहिलं असं गाव ठरलं आहे, जिथे 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एकूण 362 वयस्क लोक आहेत आणि त्या सर्वांनी लस घेतलेली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांच्या परिश्रमामुळे आणि जिद्दीमुळे हे शक्य झालं आहे. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी वेयान हे गाव बांदीपोरा जिल्हा मुख्यालयापासून केवळ 28 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र तिथे जाण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना जवळपास 18 किलोमीटरपर्यंत चालत जावं लागतं असं म्हटलं आहे.

बांदीपोरा जिल्ह्याचे मुख्य चिकित्सा अधिकारी बशीर अहमद खान यांनी सांगितलं की गावात इंटरनेट सुविधा नसल्याने शहरातील लोकांप्रमाणे येथे लोक ऑनलाईन नोंदणी करू शकत नाही. त्यामुळे इथे नोंदणी झाली नाही. गावातली लसीकरण मोहिम जम्मू-काश्मीर मॉडेलच्या अंतर्गत करण्यात आली. हे मॉडेल म्हणजे पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना लस टोचण्याची 10 सूत्र असलेली एक रणनीती आहे. कोरोना लसीकरणामुळे सर्वत्र याच गावाची चर्चा रंगली आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशीच एक घटना चेन्नईमध्ये घडली आहे.
Exit mobile version