अलिबागमधील लसीकरण सलग दुसर्‍या दिवशी बंद

। अलिबाग। विशेष प्रतिनिधी ।
कोरोना प्रतिबंधीत लसींचा साठा संपत असल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या तसेच शहरासाठीच्या सार्वजनिक वाचनालय येथील डोंगरे हॉलमधील लसीकरण केंद्रांवरील सोमवार नंतर सलग दुसर्‍या दिवशी मंगळवार दि. 20 जुलै रोजी देखील लसीकरण बंद करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील बहूतेक लसीकरण केंद्रातील डोसचा साठा संपला आहे. त्यामुळे सोमवारी नागरिकांचे लसीकरण झाले नसतानाच आजही नव्याने डोस प्राप्त न झाल्याने सलग दुसर्‍या दिवशी मंगळवारी देखील लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. नव्याने प्राप्त झालेल्या डोस नंतर पुढील सुचना देऊन लसीकरण पुर्ववत होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Exit mobile version