शेकापच्या मोफत लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी १६० लाभार्थ्यांचे लसीकरण

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने मंगळवारी (दि. २१) कुर्डुस, कुसुंबळे, ताडवागळे येथील १६० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले.

शेकापच्या माध्यमातून दि. १ ते ८ सप्टेंबर लसीकरणाचा पहिला व दि. १५ ते १८ लसीकरणाचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. यावेळी शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी अत्यंत चोख नियोजन केले होते. मंगळवारी या मोहिमेचा तिसरा टप्पा सुरु झाला. शेकापतर्फे तोडकरी रुग्णालयात नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. ऑफलाईन पद्धतीची असणारी हि लसीकरण मोहीम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी लस घेतली.

या मोहिमे अंतर्गत रोज एक किंवा दोन गाव असे नागरिकांना लस देण्यात येत आहे. बुधवारी ( दि. २२) ढवर व झालखंड, जांभूळपाडा येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. त्याच बरोबर विद्यार्थी आणि युवकांचे देखील लसीकरण करण्यात येईल.

Exit mobile version