शेकापचा सेवारथ गावागावात ; दुसर्‍या टप्प्याच्या तिसच्या दिवशी 250 लाभार्थ्यांचे लसीकरण

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने सुरु झालेला शेकापचा मोफत लसीकरणाचा सेवारथ गावागावात दाखल होत असून, नागरिकांना त्याचा लाभ मिळत आहे. शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर रोजी देवघर, वरंडे, चौल, आणि आग्राव येथील 250 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी चित्रलेखा पाटील यांचे आभार मानले.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित मोफत लसीकरणाचा पहिला टप्पा दि. 1 ते 8 सप्टेंबरदरम्यान शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या चोख नियोजनामुळे यशस्वीरित्या पार पडला. याच पार्श्‍वभूमीवर बुधवारपासून (दि. 15) मोफत लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात झाली असून, तोडकरी रुग्णालयात शेकापतर्फे नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येत आहे.
ऑफलाईन पद्धतीची असणारी ही लसीकरण मोहीम गावपातळीनुसार सुरु करण्यात आली असून, दुसर्‍या टप्प्याचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे पालन करुन नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रोज एक किंवा दोन गावांतील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. शनिवारी (दि.18) तळ, कावीर, बामणगाव, खारीकपाडा, गरुडपाडा, मल्याण, बेलोशी, महाजने येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल. यापुढे तिसर्‍या व चौथ्या टप्प्याचेही नियोजन लवकरच करण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version