पेण | वार्ताहर |
गेल्या आठवड्यात पाबळ खोर्यात लसीकरण सुरु करावे, अशी मागणी साकव संस्थेकडून करण्यात आली होती. तसेच इतरही काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली होती. या सर्व बाबींचा सारासार विचार करुन तालुका आरोग्य अधिकारी मनिषा म्हात्रे यांनी मागणीचा विचार करुन पाबळ खोर्यात कोव्हिड लसीकरणाला सुरुवात केली आहे.
या लसीकरणाच्या मोहिमेसाठी आरोग्य सेविका नैत्रा म्हात्रे (पाबळ), राजश्री म्हात्रे (वरप), अरुणा म्हात्रे (वरप), आरोग्यसेवक प्रमोद पाटील, रत्नाकर पाटील व शिक्षिका संगिता काळे हे मेहनत घेत आहेत. पाबळ खोर्यात लसीकरण सुरु झाल्याने या परिसरातील जनेतेकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर, साकव संस्थेचे संस्थापक अरुण शिवकर यांनी आरोग्य खात्याचे आभार मानले आहेत.