नव्या वर्षात खुशखबर!१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण; सोमवारपासून सुरुवात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधत शनिवारी (दि. २५) १५ ते १८ वयातील मुलांसाठी लसीकरणापासून बुस्टर (प्रिव्हेंशन) डोसपर्यंत ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, १५ ते १८ वयातील मुलांसाठी देशात लसीकरण सुरू होईल. २०२२ मध्ये ३ जानेवारीला सोमवारपासून याची सुरुवात होईल. हा निर्णय कोरोना विरोधातील देशाच्या लढाईला ताकद देईल. तसेच शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची काळजीही कमी करेल.

या घोषणांचा समावेश
१. १५-१८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरू करणार.

२. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोसची सुरुवात होणार.

३. वयोवृद्धांसाठी देखील खबरदारी म्हणून १० जानेवारी २०२२ पासून बुस्टर डोस दिला जाणार.

Exit mobile version