कळंबोलीमध्ये साकारणार वाघनखांची प्रतिकृति

। पनवेल । वार्ताहर ।

दरवर्षी कळंबोलीमध्ये घाटी मराठी संघटनेच्या माध्यमातुन शिवजयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. अनेक समाजउपयोगी कार्यक्रम करत असतानाच इतिहासाची आठवण व्हावी या उद्देशाने घाटी मराठी संघटनेतर्फे गेली 4 वर्षे शिवरायांच्या इतिहासाशी निगडित भव्य वस्तुंचे प्रदर्शन पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून केले जाते. त्यानुसार यंदाच्यावर्षी 7 फुट आणि 150 किलो वजनाच्या वाघनखांची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

2020 साली संघटनेतर्फे बनवलेल्या 12 फुट जिरेटोपाने महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष वेधुन घेतले होते. अनुक्रमे 2021 साली 8 फुट तलवार आणि 2022 साली 8 फुट राजमुद्रा अजूनही कलंबोलीकरांच्या ध्यानात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अफजल खानाचा वध करताना वापरलेल्या वाघनखांची 7 फुट लांब आणि 150 किलो वजनाची प्रतिकृति या वर्षी लक्ष वेधुन घेणार आहे.

Exit mobile version