। चिपळूण । प्रतिनिधी ।
मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पक्षातर्फे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याकडे ही नवी जबाबदारी सोपवली आहे . संघटना बांधणीसाठी खेडेकर अविरतपणे झटत आहेत . पक्ष वाढीसाठी देत असलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्याकडे निरीक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे .आपल्यावर पक्षनेतृत्वाने दिलेली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू असा खेडेकर यांनी बोलून दाखविला आहे.
निवडणूक निरीक्षकपदी वैभव खेडेकर
