। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने बापूजी क्रिकेट संघ घोटवळ व श्री दिपक जाधव मित्रमंडळ आयोजित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत पालकमंत्री चषक 2022 वर वैष्णवी इलेव्हन कोलाड संघाने आपले नाव कोरले.
सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नामवंत अशा 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जिल्हा व जिल्हाबाहेरील अनेक आयकॉन खेळाडूंनी आपली चमक दाखवीत क्रिकेट शौकिनांना बेहद खुश केले. या स्पर्धेतील उपविजेते श्रेया स्पोर्ट्स क्रिकेट संघ हाशिवरे अलिबाग संघास रोख रुपये 51 हजार 111 व चषक,तृतीय क्रमांकचे विजेते श्रेयश इलेव्हन रोहा संघास रोख रुपये 25 हजार 555 व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकाचे विजेते पेनजाई क्रिकेट संघ पेण ता.माणगाव संघास रोख रुपये 25 हजार 555 व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
चार दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेला पालकमंत्री आदिती तटकरे,आ. अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या उदघाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमास कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, दिपक जाधव, सुभाष दळवी, सागर खानविलर, गोविंद शिंदे, नितीन शिर्के,भाई दसवते,राजेंद्र पानसरे,केशव येलकर,शामराव येलकर,राजेश पानसरे, अभिलाष महाजन, निसार तलाठी ,सूर्यकांत जाधव, हरेश गजमल, पंकेश येलकर, विलास येलकर, आदी मान्यवर उपस्थित होते.