। अलिबाग । वार्ताहर ।
पोयनाड विभाग असोशिएशनच्या वतीने 11 ते 13 मार्च रोजी परिसरातील खेळाडूसाठी एपीएल चषकाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 12 संघानी सहभाग नोंदविला होता. आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी संधी मिळावी म्हणून वेगवेगळ्या व्यवसायातील कार्यरत असणार्या व्यक्ताने लिलावाव्दारे आपल्या संघाची निवड केली. सदर स्पर्धेचे उद्घाटन आस्वाद पाटील जि.प.सदस्य यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत सावित्री इलेवन तिनवीरा संघाने एबी इलेवन कोपर या संघाला नमवित थेट फायनलमध्ये प्रवेश केला. तर दुसरीकडे असोशिएशन इलेवन या संघाने सुमित इलेवन संघाला पराभूत करुन फायनलमध्ये प्रवेश केला. सावित्री इलेवन तिनवीरा संघाचा कर्णधार विनोद पाटील याने अष्टपैलू कामगिरी करत सामना जिंकला. विनोद पाटील याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गैरविण्यात आले.