माथेरानमध्ये व्हॅली क्रोसिंग पुन्हा सुरु होणार

मॉनिटरिंग कमिटी सकारात्मक .. पालिकेकडून प्रस्ताव
| नेरळ | प्रतिनधी |
माथेरानमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाला सदर व्हॅली क्रॉसिंग समावेश साहसी खेळात व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. दरम्यान, व्हॅली क्रॉसिंगचा समावेश शासनाने साहसी खेळ प्रकारात केला असून, माथेरानमध्ये त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी इको सेन्सेटिव्ह झोनच्या सनियंत्रण समितीकडून घेणे बंधनकारक होती. त्यासाठी या समितीकडे पालिकेकडून ठेवण्यात आलेल्या प्रस्तवावर सनियंत्रण समितीच्या बैठकीत साकारातमक चर्चा झाली असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी दिली. त्यामुळे लवकरच माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंग सुरु होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षात व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ यांचे पर्यटन सुरू व्हावे यासाठी माथेरानमधील राजकारणी, नगरपालिका आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला होता. त्यावेळी माथेरानमधील तरुणांना जंगलाची पूर्ण माहिती असल्याने माथेरानमधील तरुणांनी सुरू केलेल्या झिप लाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंग व्यवसायाला मोठा प्रतिसाद मिळू लागला. मात्र, माथेरानच्या जंगलावर मालकी असलेल्या वन विभागाने व्हॅली क्रॉसिंगचे सर्व दोर मोठा बंदोबस्त मागवून तोडून टाकले आणि हा व्यवसाय बंद झाला. वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद होती, मात्र प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने माथेरानमध्ये पर्यटन व्यवसायात साहसी खेळ पुनः सुरू होत नव्हते. त्यामुळे पालिकेच्या तत्कालीन अध्यक्षा प्रेरणा सावंत या मात्र पर्यटन वाढावे यासाठी शासन पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असताना पर्यटनाचे अनेक उपक्रम सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता मिळावी म्हणून पाठपुरावा करीत होत्या.

माथेरान गावातील 65 कुटुंब यांच्या दोनवेळाच्या अन्नाचा प्रश्‍न होता. याबाबतदेखील सादरीकरणामध्ये या साहसी खेळांचे आयोजन बंद झाल्याने त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. माथेरानमध्ये पर्यटन हा एकमेव व्यवसाय असल्याने पर्यटकांसाठी जंगल भागात दोन डोंगर, तलावाच्या दोन बाजू यांना झिप लाईन म्हणजे व्हॅली क्रॉसिंगद्वारे जोडण्याचा व्यवसाय केला जात होता. दरम्यान, जुलै 2021 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पर्यटनवाढीसाठी साहसी खेळांना मान्यता दिली आहे. माथेरानमध्ये व्हॅली क्रॉसिंगसारखे साहसी खेळ हे पर्यटकांच्या आवडीचे केंद्र बनले होते. त्यामुळे साहसी खेळ पुन्हा सुरू व्हावेत यासाठी माथेरान पालिका आग्रही होती. त्यानंतर शासनाने निर्णय घेऊन परवानगी दिली आहे असल्याने वन विभागाने घातलेली बंदी उठवावी आणि व्हॅली क्रोसिंगचा समावेश साहसी खेळामध्ये माथेरान पर्यटन स्थळी व्हावा यासाठी प्रेरणा सावंत यांचा त्यांच्या अध्यक्ष पदाच्या काळात शासन दरबारी प्रयत्न सुरु होता.

राज्य सरकारने माथेरान नगरपरिषदेला सनियंत्रण समितीकडे प्रस्ताव सादर करायला सांगितले होते. त्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वी अलिबाग येथे झालेल्या सनियंत्रण समितीच्या बैठकीत चर्च झाली. माथेरानमधील स्थानिकांच्या वतीने पालिकेकडून मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी बाजू मांडली. शासन स्वतः साहसी खेळामध्ये व्हॅली क्रॉसिंग चा समावेश करीत असल्याने सुरक्षेची काळजी घेऊन या व्यवसायाला मान्यता देण्याचा माथेरान गिरीस्थन नगरपरिषदेच्या त्या प्रस्तावावर बैठकीत चर्च झाली आणि ती चर्चा सकारात्मक झाली असल्याची माहिती मुखताधिकारी आणि समितीच्या सदस्य सुरेखा भणगे यांनी दिली. मात्र, अद्याप त्यावर सनियंत्रण समितीने निर्णय घेतला नसल्याचेदेखील मुख्याधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.


व्हॅली क्रॉसिंग…
माथेरानमधील लुईजा पॉईंटपासून एको पॉईंट जोडणारा रोप पर्यटकांच्या सर्वात आवडता व्हॅली क्रॉसिंग पॉईंट समजला जातो. त्याचवेळी एको पॉईंट ते हनिमून पॉईंट हा ट्रेकदेखील पर्यटकांच्या आवडीचा समजला जातो. माथेरानला पाणीपुरवठा करणार्‍या शॉरलेट लेक या तलावात या तीरावरून दुसर्‍या तीरावर पोहचण्यासाठी रोप बसविला जातो. पाण्याच्या वरून जाण्याचा चित्तथरारक अनुभव माथेरानमध्ये पर्यटक घेत होते.त्याचवेळी अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, खंडाळा पॉईंट, हनिमून पॉईंट आदी ठिकाणी साहसी खेळांचा थरार अनुभवास मिळत होता.

Exit mobile version