पनवेलमधील घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

| पनवेल | प्रतिनिधी ।

घरात शिरून चोरट्याने सुमारे 14 लाख 25 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे 5 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेलच्या देवदगाव येथील अनमोल रेसिडेन्सीमध्ये राहणारे अक्षय प्रताप पाटील यांच्या घरात दरवाजातून प्रवेश करून ही चोरी झाली. घरातील कपाट उघडून सोन्याचे गंठण, राणीहार, अंगठ्या असा सुमारे 14 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.

Exit mobile version