| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
खांदा वसाहत सेक्टर 2 येथील खांदेश्वर तलाव परिसरात बंद असलेले सार्वजनिक शौचालय लवकरच नागरिकांसाठी खुले होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नगरसेवक दशरथ म्हात्रे आणि माजी उपमहापौर नगरसेविका सीताताई पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रश्नाला अखेर मार्ग मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीनंतर नगरसेवक दशरथ म्हात्रे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत महापौर नितीन पाटील तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी माजी उपमहापौर सीता पाटील यांनीही प्रशासनाकडे पाठपुरावा करत नागरिकांच्या अडचणी मांडल्या. या संयुक्त प्रयत्नांनंतर प्रशासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती समारे आली आहे.






