| नागोठणे | वार्ताहर |
मेढा विभागातील वरवडे गावातील रहिवासी वामन दौलत खांडेकर (वय 75) यांचे सोमवार दि. 29 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वरवडे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला मेढे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत वामन खांडेकर यांच्या पश्चात पत्नी, सुनिल व अनिल हे दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी शोभा लोखंडे, सुना, जावई, नातवंडे यंच्यासह मोठा परिवार आहे. दिवंगत वामन खांडेकर यांचे दशक्रिया विधी बुधवार दि. 7 फेब्रुवारी रोजी तर उत्तरकार्य विधी शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे खांडेकर कुटुंबियांच्या वतीने अनिल खांडेकर यांनी केले आहे.