। गुजरात । वृत्तसंस्था ।
गुजरातमधील वलसाडमध्ये वंदे भारत ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला आहे. ही घटना वलसाडच्या अतुलजवळ घडली. गेल्या महिन्याभरात ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला अशा प्रकारे अपघात होण्याची ही तिसरी घटना ठरली आहे.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 8.17 च्या सुमारास वलसाडमध्ये घडली असून, घटनेनंतर वंदे भारत ट्रेन जवळपास 30 मिनिटे थांबवण्यात आली होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अचानक ट्रेनला गायीची धडक बसल्याने ट्रेनच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. तसेच रेल्वेच्या इंजिनाजवळील खालच्या भागात नुकसान झाले आहे.