कृषिरत्न शेखर भडसावळे यांना वंदे मातरम किसान पुरस्कार

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील मालेगाव येथे प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून नंदनवन फुलविणारे आणि शेकडो शेतकर्‍यांना प्रयोगशील शेती करण्याची प्रेरणा देणारे शेखर भडसावळे यांना वंदे मातरम संस्थेचा वंदे मातरम किसान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील राजभवन येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले.
अमेरिकेतील बड्या पगाराची नोकरी सोडून भारतात परत येऊन आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून प्रयोगशील शेती करणारे म्हणून शेखर भडसावळे यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण आणि कृषी क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाचा कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शेती करणे सोपे जावे यासाठी भडसावळे यांनी अनेक शेती अवजारे यांची निर्मिती केली आहे. तर कृषी पर्यटन संकल्पना देशात आणणारे म्हणून शेखर भडसावळे यांची शेती क्षेत्रात ओळख आहे. तर शेतकर्‍यांना आर्थिक सधन करणार्‍या कृषी पर्यटन संकल्पनेमुळे शेकडो शेतकरी या क्षेत्रंत्र उभे राहावले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरावर काम करणार्‍या वंदे मातरम संस्थेच्या वतीने किसान पुरस्कार शेखर भडसावळे यांना मुंबईत राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात देण्यात आला. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शेखर भडसावळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला,त्यावेळी प्रा.अनुराधा भडसावळे या देखील उपस्थित होत्या.

Exit mobile version