वरंडेचा सरपंच सुधीर चेरकरला अटक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

बैलगाडी हाकलण्यावरून झालेल्या वादात एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी भाजपचा कार्यकर्ता व वरंडेचा सरपंच सुधीर चेरकर याला अटक करण्यात आली आहे. मारहाण केलेला इसम गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी भेरसे येथे घडली.

ऋषीकेश नागावकर असे जखमीचे नाव आहे. रविवारी भेरसे या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याची जबाबदारी सुधीर चेरकर यांनी घेतली होती. सायंकाळी बैलगाडी सोडताना ऋषीकेश यांची बैलगाडी लाईनच्या मागून सोडली. त्यामुळे त्यांची बैलगाडी मागेच राहील्याने शेवटचा नंबर आला. याबाबत ऋषीकेश यांनी विचारणा केली त्यावेळी त्यांच्या दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. हा वाद विकोपाला पोहचला. सुधीर चेरकर यांनी ऋषीकेश यांना मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी सुधीर चेरकर यांच्या विरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version