| सुतारवाडी | वार्ताहर |
संभे येथील कालकाई वृद्धाश्रमाला खासदार सुनील तटकरे यांच्या पत्नी वरदा तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी वृद्धाश्रमातील सर्व वृद्धांची आगत्याने चौकशी करून त्यांचे आशीर्वाद घेतले. खासदार सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची साखर, विविध कडधान्यांनी तुला करण्यात आली होती. त्या सर्व जीवनावश्यक वस्तू वरदा तटकरे यांनी संभे येथील कालकाई वृद्धाश्रमातील वास्तव्यास असलेल्या पंधरा वृद्धांना दिल्या. कालकाई वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनंदा मोहिते यांनी वरदा तटकरे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राकेश शिंदे, श्रीकांत चव्हाण, महेंद्र वाचकवडे, कुमार लोखंडे, समीर शिंदे, वसिम नुराजी, राकेश लोखंडे, अविनाश पलंगे, संजय मांडलूसकर, संजय सानप, आदिम हाफीज, महेश वाचकवडे, गणेश वाचकवडे त्याचप्रमाणे सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.