। रसायनी । वार्ताहर ।
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक तुपगावचे समाजसेवक सचिन साळवी यांच्यावतीने तुपगांव चौक ग्रामीण रुग्णालयामधील रुग्णांना फळ वाटप करुन रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तुपगाव जिल्हा परिषद शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे किट व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी रमेश दळवी, सुनिल कांबळे, द्वारकानाथ गावडे, विकी गायकवाड, अनिल पाटील, अंकुश नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेलं यांनी सर्वाचे आभार मानले.