पोलादपूर नगरपंचायतीतर्फे महिला दिनी विविध स्पर्धा

| पोलादपूर | प्रतिनिधी |

शहरातील महिलावर्गासाठी पोलादपूर नगरपंचायतीतर्फे येत्या 7 व 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती अस्मिता उमेश पवार यांनी दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये मंगळवारी (दि.7) दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत पहिल्या 30 महिला स्पर्धकांसाठी मर्यादित तांदूळ व नारळाचे पदार्थ या विषयावरील पाककला स्पर्धा तसेच (दि.8) महिला दिन विशेष आणि स्त्री कर्तृत्वाला मानाचा मुजरा या विषयांवर रांगोळी स्पर्धा आणि दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत फनी गेम्स आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही दिवशी पोलादपूर शहरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बालकल्याण सभापती अस्मिता उमेश पवार यांनी केले असून, याप्रसंगी नगरसेविका शिल्पा दरेकर आणि तेजश्री गरूड यादेखील सहकार्य करणार आहेत.

Exit mobile version