शेकापतर्फे मुरुडमध्ये विविध विकासकामे

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मंगळवारी मुरुड तालुक्यातील सावली, टोकेखार व चिचघर या गावांमध्ये जिल्हा परिषद सेस व जिल्हा परिषद 15 वा वित्त आयोगातून झालेल्या विकासकामांचे लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद सदस्या नम्रता अजित कासार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला तुकाराम पाटील, अजित कासार, संतोष पाटील, राजेश करजेकर, शीताराम कांबळे, अंकुश मिसाळ, के.पी.कांबळे, किसन कांबळे, नथुराम माळी, चंद्रकांत बेडेकर, विठ्ठल कांबळी, भारत महादन, भरत माळी, जगदीश माळी, पोलीस पाटील कृष्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते. शेकापनेते पंडित पाटील व तालुका चिटणीस मनोज भगत यांनी या गावासाठी विविध विकासकामे पूर्ण करण्याबाबत वचन दिले होते. त्याप्रमाणे सर्व कामे पूर्णत्वास गेल्याने येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. आतापर्यंत आमच्या गावांत झालेली विकासकामे ही शेकापक्षानेच केली आहेत. आम्ही शेकापक्षा बरोबरच राहणार असे या निमित्ताने येथील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या नम्रता कासार यांच्या हस्ते सावली प्रवेशद्वार, चिचघर एसटी पिकअप शेड याचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.

Exit mobile version