| कोर्लई | वार्ताहर |
मुरुडच्या श्री काळभैरव नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे संस्थेचे संचालक, कर्मचारी व प्रतिनिधी यांचा यथोचित सत्कार (दि.24) सोमवारी आयोजित करण्यात आला. श्री काळभैरव संस्थेच्या प्रतिनिधी तृप्ती रुपेश पाटील यांची शिवसेनेकडून रायगड जिल्हा महिला संघटिकापदी नियुक्ती झाल्याबद्दल, तसेच संस्थेचे संचालक प्रतिक रमेश पेडणेकर यांची श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय यशवंतनगर नांदगाव हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदी नियुक्ती तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल व संस्थेचे कर्मचारी कु. प्रथमेश प्रदीप पुलेकर यांनी जीवाची परवा न करता शॉक सर्किटमुळे रसाळ खानावळ यांच्या किचनमध्ये लागलेल्या आगीमधून सिलेंडर बाहेर काढले या सर्वांना कौतुकाची थाप म्हणून संस्थेतर्फे श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे मान्यवर चेअरमन दिपक पालशेतकर, व्हाईस चेअरमन स्नेहा पाटील संचालक सुरेश कासेकर, प्रतीक पेडणेकर व दीपक मयेकर. संचालिका उषा खोत तसेच मॅनेजर, प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा खोत यांनी तर आभार स्नेहा पाटील यांनी मानले.