उरण नपातर्फे विविध कार्यक्रम

| उरण | वार्ताहर |

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत उरण नगरपरिषद वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री .नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा टेरेसवर गाथा स्वातंत्र्याची देश भक्तीपर गीतांचा कार्यक्रम सदर करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष माळी, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधनी, प्रणाली संतोष माळी, रवी भोईर, कौशिक शाह, जानव्ही पंडीत, राजेश ठाकूर, लेखाअधिकारी सुरेश पोसतांडेल, कर अधीक्षक संजय डापसे, कनिष्ठ अभियंता झुंबर माने, आरोग्यनिरीक्षक हरेश तेजी, संजय पवार. सचिन नांदगावकर, प्रसाद मांडेलकर, नितेश पंडीत, महिला वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, महिला बचत गट सदस्या व अध्यक्षा आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन नितेश पंडीत यांनी केले. रविवारी चित्रकला, निबंध, वतृत्व आदी स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी उत्कृष्ट चित्र काढून देशावरील प्रेम दाखविले. सर्व स्पर्धा मध्ये मोठ्या प्रमाणत प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version