बाहे येथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील बाहे येथील विद्यार्थी व शाळेचे माजी विद्यार्थी यांच्या विद्यमाने शिवजयंती उत्सव सोहळ्याचे औचित्य साधून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मनोज थिटे, काशिनाथ थिटे, सुनील थिटे, शशिकांत शेळके, अनिल सुटे, गणेश पवार, योगेश बामुगडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर, मान्यवर म्हणून गजानन माटल, दत्ताराम थिटे, अशोक थिटे, सचिन देवकर, संदीप मनवे, विश्वास गोविलकर, हाके सर, संदीप मोरे, मोरेश्वर भगत, शैलेश ठाकूर, मंगेश गोविलकर, सुनील शेलार, स्वाती ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version