कोलाडमध्ये विविध कार्यक्रम संपन्न

। कोलाड । वार्ताहर ।

जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (दि.1) कोलाड येथील संपूर्ण आंबेवाडी बाजारपेठेतुन रॅली काढण्यात आली. यावेळी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी जेष्ठ नागरिकांना आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, तुम्ही उद्याची पिढी घडवत आहात. यामुळे मला तुमचा अभिमान आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम वेगाने सुरु असुन हा रस्ता जागोजागी खोदून ठेवला आहे. यामुळे तुम्ही घराबाहेर पडू नका. तुमच्या कोणतेही अन्याय झाले किंवा संकट आले तर तुम्ही मला फोन करा, मी तुमच्यासाठी हजर असेन, असे सांगण्यात आले. तसेच डॉ. मंगेश सानप यांनी जेष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुमच्या संस्कारामुळे आम्ही घडलो आहोत. शेती करणे हा आपला मुख्य व्यवसाय असुन आता शेती ही काळबाह्य होत आहे. यामुळे तुमच्या सारखी पिढी पुन्हा होणे नाही. येणार्‍या काळात आपली काळजी घ्या व आनंदात जगण्याचे सानप यांनी सांगीतले.

यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते, अंमलदार नरेश पाटील, डॉ. मंगेश सानप, रविंद्र लोखंडे, डॉ. श्यामभाऊ लोखंडे, विश्‍वास निकम, नंदकुमार कळमकर, राजेंद्र कप्पू, डॉ.विनोद गांधी, विठ्ठल सावळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष मारुती राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

Exit mobile version