शासन आपल्या दारीतर्फे मुरुडमध्ये विविध कार्यक्रम


| कोर्लई | वार्ताहर |

शासकिय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. याचाच भाग मुरुड तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन शासकिय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

याचाच भाग दि. 19 मे रोजी स. 10.00 वा. काकळघर, भोईघर, विहूर, तेलवडे, वळके, दि. 20 मे रोजी सावली, बोर्ली, काशिद, तळेखार, आंबोली, दि. 22 मे रोजी वावडुंगी, राजपूरी, कोर्लई, मजगांव, चोरढे, दि. 23 रोजी मांडला, वेळास्ते, साळाव, शिघ्रे, दि. 25 मे रोजी मिठेखार व एकदरा ग्रामपंचायतीत सकाळी 10. 00 वा. आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शासकिय योजना, नवीन मतदार नोंदणी, संजय गांधी योजना लाभ संबंधीत, उत्पन्न दाखले, दुय्यम शिधा पत्रिका, जन्म मृत्यू दाखले,विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विविध आवास योजनांची माहिती व लाभार्थी, कृषी विभागाच्या विविध लाभांची माहिती देणे, आ. भा. कार्डाची नोंदणी, ई श्रम कार्डाची नोंदणी, आधारकार्ड नोंदणी, पी. एम. किसन योजना ई-के. वाय. सी अपडेशन इ. चा समावेश आहे. यासाठी शासनाच्या संबंधित यात तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांचा ही सहभाग व मार्गदर्शनअसणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसीलदार रोहन शिंदे यांनी केले आहे.

Exit mobile version