। कोर्लई । वार्ताहर ।
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या असून जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतीच्या 172 जागांसाठी निवडणूक होत आहे. यात मुरुड तालुक्यातील वावडुंगी, सावली, राजपूरी, एकदरा व चोरढे पाच ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या पदांसाठी दि. 5जून 2022 रोजी मतदान होणार असल्याचे व पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार अमित पूरी यांनी दिली.
मुरूड तालुक्यातील वावडुंगी-1, सावली-1, राजपूरी-4, एकदरा 8 व चोरढे 1 या पाच ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या एकूण 15 पदांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी तहसीलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा गुरुवार दि.05-05-2022 आहे. नामनिर्देशनपत्रे (नमुना ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) मागविण्याचा व सादर करण्याचा शुक्रवार दि.13 मे ते शुक्रवार दि.20 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वा.ते दु.3.00वा. (शनिवार, रविवार व सार्व.सुटी वगळून), नामनिर्देशन पत्र छाननी सोमवार दि.23-05-2022 रोजी सकाळी 11.00 वा.पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा दिनांक 25-05-2022(बुधवार) दुपारी 3.00 वा.पर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दि.25-05-2022(बुधवार) असून दुपारी 3.00 वा.नंतर अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास रविवार दि.05-06-2022 रोजी सकाळी 7.30वा.पासून ते सायंकाळी 5.30 वा. मतदान घेण्यात येणार असून सोमवार दि.06-06-2022 रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येतील. अशी माहिती निवडणूक नायब तहसिलदार अमित पूरी यांनी दिली आहे.